Saturday, January 17, 2015

'ती' आठवण

आसॆच नुसते बसले असता
एक आठवण मनाला गिळते
कोण्या काळाची 'ती' आठवण
माझ्या डोळ्यात पाणी आणते ||


'ती' आठवण मनाला घेऊन जाते 
काळविश्वात जिथे 'ती' रहाते
ते जग होते माझ्या प्रेयसीचे 
जीने मला अणि जगालाच सोडले होते ||

Friday, October 10, 2014

जन्म

हि कविता वाचण्या आधी :-



विचार करा एका माणसाचा ज्याचा जन्म झाला तेवा तो अनाथ होता,

विचार करा अश्या माणसाचा जो एकटा आहे जीवन सापंत आलेला असताना...



१०० जन्म फुलपाखराचे चालतील
एका मनुष्य जन्मापेक्षा,
१ दिवसाचे जीवन आवडेल
६० वर्षाच्या यातानांपेक्षा,
ज्या दिवशी जन्मू त्याच दिवशी मरण चालेल
मरण येण्याच्या वाट बघण्य पेक्षा,
म्हणून म्हणतो देवा
१०० जन्म फुलपाखराचे चालतील
एका मनुष्य जन्मापेक्षा !!!